Ganesh Utsav : गणेशभक्तांसाठी बातमी! पुण्यात गणेशोत्सवात पाळावे लागणार ‘हे’ नियम, नहीतर होणार तुरुंगवारी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय..
Ganesh Utsav : वैभवशाली विसर्जन परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत आहे. लेझर प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याच्या घटना गेल्या वर्षी घडली होती.
त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. कारण पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझरवर बंदी करण्यात आली आहे, पुणे पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. Ganesh Utsav
पोलीस प्रशासनाचा निर्णय…
बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. ढोल ताशा पथकांच्या वादनाची वेळ निश्चित करण्यात येणार आहे. ढोल ताशा पथकातील वादकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यासह केळकर आणि कुमठेकर रस्त्यावर वर्षानुवर्ष मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनाच परवानगी दिली जाणार आहे.
त्यामुळे या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी काळजी घेण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे प्रशासन यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझरवर बंदी…
पुण्यामध्ये गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर बिम लाईट लावल्यास संबंधित गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांसोबत आयुक्तालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.