राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज २ जानेवारीपासून राहणार बंद, नेमकं कारण काय? जाणून घ्या…

बीड : राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले यांच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज येत्या 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने याबाबत निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

यामुळे आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मस्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. यामुळे याचे पडसाद उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुसर्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. यामुळे सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे.

याबाबत राजकीय वरदहस्त असल्याने अनेकजण मोकाट फिरत असून त्यांना अजून अटक करण्यात आली नाही. मस्साजोग प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत.

यामुळे त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मात्र अजूनही सरकार पाऊले उचलत नाही.