हाय हिल्सवरून झाला राडा, अन् प्रकरण घटस्फोटापर्यंत, सँडल्समुळे जोडपं थेट पोलिसांत, नेमकं घडलं काय?


नवी दिल्ली : एखाद्या चपलेमुळे किंवा सँडलमुळे घटस्फोट होत असेल तर ? एखाद्या सँडलमुळे कोणी घटस्फोट कसं मागू शकतं ? असा विचार तुमच्याही मनात आला असेल ना. पण असे झाले आहे, हे खरंच घडलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

आग्रा येथे राहणाऱ्या एका जोडप्याचे २०२४ मध्ये लग्न झाले. त्या जोडप्यातील महिलेला उंच टाचांच्या सँडल ( हाय हिल्स) घालण्याची आवड होती, म्हणून तिने पतीकडे हाय हिल्स असलेल्या सँडलची मागणी केली. नवऱ्याने ते सँडल्स आणूनही दिले, पण तरीही त्यांचे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचले.

त्यांच्यात नेमकं काय बिनसलं ? खरंतर झाले असं की, त्या इसमाची पत्नी एकदा हाय हिल्स घातल्यामुळे पडली. त्यानंतर तिला खूपच लागलं. त्यामुळे बायकोच्या काळजीपोटी नवरा हाय हिल्सच्या विरोधात होता. पण प्रत्येकाची एक आवड असते.

त्या महिलेला हाय हिल्स घालण्याची एवढी आवड होती की तिची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिने पतीशी थेटं भांडण सुरू केलं. पाहता पहात हाँ वाद वाढला आणि प्रकरण थेट पोलिसांतच गेला.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनाही धक्का बसला. पत्नी जेव्हा जेव्हा हाय हिल्स सँडल मागायची तेव्हा त्या दोघांमध्ये वाद व्हायचे, असे समोर आले. गेल्या महिन्यात हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये भांडण झाले आणि पत्नी आपल्या माहेरी निघून गेली. महिन्याभरापासून ती माहेरीच रहात होती.

अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी तो वाद कुटुंब समुपदेशन केंद्राकडे ट्रान्सफर केला. मी सतत हाय हिल्सच्या सँडलची मागणी करते, तेव्हा पती सांगतात की पगार झाल्यावर सँडल आणून देईन. गेल्या ८ महिन्यांपासून हेच सुरू आहे, पण आत्तापर्यंत त्यांनी हाय हिल्सच्या सँडल आणून दिल्या नाहीत’ असं सांगत पत्नीने तिची बाजू मांडली. आणि आता याच काराणावरून पती-पत्नी घटस्फोटाची मागणी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!