Pune News : MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले; एकाला अटक
Pune News : अभिलाषा ही वाशिम जिल्ह्यातील असून ती MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे शहरात आली होती. मात्र पुण्यात तिने ७ एप्रिल रोजी गळफास घेत आपले जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला. अभिलाषा गुरुवार पेठ या ठिकाणी एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती.
यावेळी होस्टेलमध्ये डिपॉझिटचे पैसे मागितले म्हणून वस्तीगृह चालकाने तिला मारहाण केली होती. आणि या मारहाणीमुळेच अभिलाषाने आपले जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत होती. या तरुणीच्या मृतदेहाचे शिवविच्छेदन केल्यानंतर तिच्या अंगावर मारहाणीच्या खुना देखील होत्या. त्यामुळे संशय निर्माण झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचा उल्गाडा झाला आहे. वसतिगृह चालकाने अभिलाषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.