Fire News : अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, प्रवाशांनी टाकल्या रेल्वेतून उड्या, रेल्वेचे डबे जळून खाक..

Fire News अहमदनगर : अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत रेल्वेचे चार ते पाच डब्बे जळून पूर्ण खाक झाल्याची माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. Fire News
मिळालेल्या माहिती नुसार, मराठवाड्यासाठी खूप महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असणाऱ्या अहमदनगर आष्टी रेल्वेला वाळूंज येथे दोन डब्यांना आग लागली. सुरुवातीला ही आग पहिल्या दोन डब्यांना लागली होती, परंतु ती पुढे पाच डब्यांपर्यंत गेली. स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
आग दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी लागली. आगीचे कारण अजूनही समोर आले नाही. रेल्वे प्रशासनाकडून याचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, अग्निशामक दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घडनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.