पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू…

पुणे : पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्यात दोन मुलांचा समावेश आहे. ही आग बुधवारी (ता.३० ) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
चिमणाराम चौधरी (वय. ४५), ज्ञानुदेवी चौधरी (वय . ४०), सचिन चौधरी (वय . १०) आणि भावेश चौधरी (वय. १५) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, चिंचवड येथील पूर्णानगर येथे सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. पहाटेच्या सुमारास या दुकानातून धुर येत असल्याची पाहून नागरिकांनी अग्निशामन दलाला माहिती कळविली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये पाण्याचा मारा करुन काही वेळातच आग विझवली. या आगीत दुकानातील चौघांचा होरपळून मृत्यु झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.