अखेर प्रतीक्षा संपली! ‘हेरा फेरी ३’ बाबत महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकूटाच्या अफलातून कॉमिक टायमिंगने सजलेला ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोन्हीही चित्रपट चांगलेच गाजले. आता प्रेक्षकांना आतुरता आहे, ती ‘हेरा फेरी ३’ची… . त्यानंतर सुनील शेट्टीने एक मोठी अपडेट दिली आहे.
त्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. ‘हेरा फेरी 3’ चा टीझर कोणत्या दिवशी रिलीज होणार आहे याचीच माहिती सुनिल शेट्टीने दिली आहे. चित्रपटाचा टीझर यापूर्वीच शूट झाला असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल ही त्याने माहिती दिली आहे.
सुनील शेट्टीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही ‘हेरा फेरी 3’ साठी शूटिंग सुरू केली आहे. त्याचा टीझरही शूट झाला आहे. आशा आहे की ‘हेरा फेरी 3’ चा टीझर आयपीएल दरम्यान रिलीज होईल. अंतिम सामन्यापूर्वी ‘हेरा फेरी 3’ चा टीझर प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असं तो म्हणाला.
मी खूप उत्सुक आहे, कारण आमची तीच जुनी टीम एकत्र आली आहे. हा चित्रपट नेहमीच खास राहिला आहे. असं ही तो म्हणाला. विशेष म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत. त्यांनीच चित्रपटाचा पहिला भागही दिग्दर्शित केला होता.
सुनील शेट्टीने यावेळी चित्रपटाच्या शूटिंगबद्दल अनेक अपडेट्स दिल्या आहेत. ते म्हणाले, आम्ही तिघेही जेव्हा एकत्र येतो, तेव्हा सेटवर आनंदाचे वातावरण असते. खरं सांगायचं तर, तिथे वॉर्निंग बोर्ड लावायला पाहिजे. कारण आम्ही मिळून संपूर्ण सेटचे वातावरण बदलून टाकतो. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शनही म्हणतात, ‘तुम्हाला मजा करायची असेल, तर शॉट झाल्यावर करा’. ‘हेरा फेरी ३ ची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘हेरा फेरी’ चित्रपट २००० मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर त्याचा दुसरा भाग २००६ मध्ये रिलीज झाला होता.