अखेर नीरा देवघर १०० टक्के भरले, इतर धरणे कधी भरणार; जाणून घ्या टक्केवारी…


भोर : पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी महत्वाचे असणारे धरण म्हणजे नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे २ ऑगष्टला नीरा-देवघर धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला होता.

सध्या दररोज ६ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत पुरेशी वाढ होत नव्हती. वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग ४०० क्युसेकने कमी करून ३५० करण्यात आला.

धरणात ११.९१ टीएमसी पाणीसाठा झाला. शनिवारी रात्री बारा वाजता वीजनिर्मिती केंद्रातून पुन्हा ७५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गेल्यावर्षी १३ ऑगष्टला नीरा-देवघर धरण शंभर टक्के भरले होते.

तसेच सध्या सध्या भाटघर 88, गुंजवणी 81, वीर 76 टक्के भरली आहेत. यामुळे ही धरणे देखील लवकरच भरतील. नीरा-देवघर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढून धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास धरणाच्या सांडव्याचे दरवाजे उघडण्यात येणार आहे.

याबाबत नीरा पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले. असे असले तरी पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!