अखेर ठरलं? शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंददाराआड चर्चा, राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर….

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असे सांगितले होते. असे असताना आज पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती आहे.
तीन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात साखर संकुलात आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना काय फायदा होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार, शरद पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर नेतेदेखील उपस्थित होते.
असे असताना या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळे आता दोन्ही पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा होत आहे.
आज साखर संकुलाकील बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील वगळता सर्व नेते बैठकीतून बाहेर पडले. केवळ शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील बैठकीच्या रुममध्ये बसून होते. यामुळे त्यांच्यात संवाद झाल्याचे बोलले जात आहे.