मोठी बातमी! अखेर संभाजी भिडेंसह १५० जणांवर गुन्हा दाखल, ‘ते’ प्रकरण आलं अंगलट..


पुणे : शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांचा आदेश धुडकावतं मार्गदर्शन बैठक घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संभाजी भिडे, यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी रितेश नाळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संभाजी भिडे यांची शनिवारी (ता.2) नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावातील मारुती लॉन्स येथे सभा आयोजित केली होती.

संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. तसेच संभाजी भिडे यांची सभा झाली तर ती उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते.

मांजरी कोलवडी गावात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी संभजी भिडे यांच्या सभेला परवानगी नाकारली होती.

मात्र, परवानगी नसताना संभाजी भिडे यांची सभा झाली. त्यामुळे पोलिसांनी रविवारी (ता. 3) मध्यरात्री संयोजक, संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांवर गुन्हा दाखल केला

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!