जावयाने मेव्हणीला पळवून नेले, सासऱ्याची थेट दौंड पोलीसात धाव…!


दौंड : बारामतीमध्ये राहणाऱ्या  जावयाने धाकट्या मेव्हणीला खोरवडी (ता.दौंड ) येथून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.५) घडली आहे. याप्रकरणी सासऱ्याने जावयाच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची लहान मुलगी रविवारी (ता.५) घरात दिसली नाही. त्यामुळे फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीस बोलावून घेतले व मुलगी घरी दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी मुलीचा शोध दौंड व खोरवडी परिसरात घेतला. मात्र मुलगी आढळून आली नाही.याचदरम्यान जावई किरण चव्हाण हा देखील घरी नसल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली होती. त्यानंतर सासरे तातडीने जावयाच्या कारखेल येथील घरी गेले असता तेव्हा त्यांना तेथे मोठी मुलगी आढळून आली. मात्र जावई घरी दिसला नाही. त्यामुळे जावयानेच मुलीला पळवून नेल्याचा संशय सासऱ्याला आला.

किरण नवनाथ चव्हाण (रा. कारखेल ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी सासऱ्याने जावई किरण चव्हाण याच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!