माळेगावच्या निवडणुकीत लढत ठरली!! चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी पॅनल केला जाहीर, अजित पवारांपुढे मोठं आव्हान…

बारामती : सध्या माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनलचे उमेदवार जाहीर केले.
यामुळे आता माळेगाव कारखान्यावर जोरदार लढत बघायला मिळणार आहे. तसेच शरद पवार गट देखील मैदानात उतरला आहे. सहकार बचाव पॅनलमध्ये, गट क्रमांक एक माळेगाव मधून तावरे रंजनकुमार शंककराव, काटे संग्राम उर्फ गजानन शंकरराव, गोफणे रमेश शंकरराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच गट क्रमांक दोन पणदरे मधून जगताप सत्यजित संभाजी, जगताप रणजित शिवाजीराव, कोकरे रोहन रविंद्र यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी जोरदार लढत बघायला मिळणार. तसेच गट क्रमांक तीन सांगवीमधून तावरे चंद्रराव कृष्णराव, खलाटे रणजित विरसेन, खलाटे संजय बाबुराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच गट क्रमांक चार शिरवलीमधून पोंदकुले मेघशाम विलास, सस्ते विलास नारायण यांना तर गट क्रमांक पाच निरावागज मधून देवकाते राजेश सोपान, देवकाते केशव तात्यासाहेब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनेकांना वाटत होतं की छत्रपती कारखान्याप्रमाणे याठिकाणी विरोधक एकत्र येतील, मात्र तसे झाले नाही.
गट क्रमांक सहा बारामतीमधून गावडे गुलाबराव बाजीराव, गवारे विरसिंह विजयसिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रवर्गातून देवकाते भालचंद्र बापुराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार देखील रिंगणात उतरले असून यामुळे चुरस वाढली आहे.
तसेच महिला प्रतिनिधी प्रवर्गातून कोकरे राजश्री बापुराव, गावडे सुमन तुळशिराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातून गायकवाड बापुराव आप्पा, इतर मागास प्रवर्गातून नाळे रामचंद्र कोंडिबा व भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातून देवकाते सुर्याजी तात्यासाहेब यांना सहकार बचाव पॅनलने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल.