बचत गटाच्या पैश्यावरून झाला राडा!! थेऊरमध्ये दोन भावंडांना सख्ख्या बहिणी, दाजी व भाच्याकडून बेदम मारहाण…

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी बांगडयाचा माल घेवुन जायचा नाही, अगोदर बचत गटाचे राहिलेले पैसे दे, यावरून सुरु झालेल्या वादारून दोन भावंडांना दोन सख्ख्या बहिणी, दाजी व भाच्याने लाकडी बांबूने मारहाण केली.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत मुनशाद सुलतान मणीयार, आसमा आफरोज खान, सुलतान चाँदसाहब मणीयार व सलमान चॉदसाहब मणीयार ( सर्व रा. नायगांव रोड, थेऊर, ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुलनाज हुसेन फुलारी ( रा. नायगांव रोड, थेऊर,) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, अझमत हा बांगड्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. अझमत याने बहिण आसमा खान यांच्या घरी बांगडयाचा माल ठेवला होता. अझमतने आसमा खान यांच्या घरी ठेवलेला बांगडयाचा माल घेण्यासाठी गुलनाज व त्याचा भाऊ हारुन हे दोघे गेले होते. तेव्हा फिर्यादी गुलनाज यांची मोठी बहिण मुनशाद मणीयार, तिचे पती सुलतान मणीयार व मुलगा सलमान हे तेथे होते.
यावेळी आरोपी फिर्यादी व त्यांचा भाऊ हारुन याला म्हणाले, बांगडयाचा माल घेवुन जायचा नाही, अगोदर बचत गटाचे राहिलेले पैसे दे, तसेच यावेळी शिवीगाळ केली. तसेच मुनशाद यांनी लाकडी बांबुने मारहण केली व आसमा हिने हाताने मारहाण केली. तसेच जखमी केले, असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश करे करत आहेत. याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.