‘पाऊले चालती पंढरीची वाट…’ आषाढी वारीसाठी कोणत्या पालखीचं कधी प्रस्थान? पाहा संपूर्ण वेळापत्रक


पुणे : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक. लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी मार्गक्रमण करतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघणाऱ्या विविध संतांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात एकत्र येतात. यंदाच्या आषाढी वारी 2026 साठी राज्यभरात उत्साहाचे वातावरण असून पालखी सोहळ्यांचे प्रस्थान आणि मुक्कामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (देहू)

श्री संत तुकाराम महाराजांची पालखी 7 जुलै रोजी देहू येथील मुख्य मंदिरातून प्रस्थान करणार आहे.

मुक्कामाचे वेळापत्रक..

7 जुलै – देहू (इनामदार साहेब वाडा)
8 जुलै – आकुर्डी
9 व 10 जुलै – पुणे (दोन दिवस)
11 जुलै – लोणी काळभोर
12 जुलै – यवत
13 जुलै – वरवंड
14 जुलै – उंडवडी गवळ्याची
15 जुलै – बारामती
16 जुलै – सणसर
17 जुलै – बेलवडी (पहिले गोल रिंगण)
18 जुलै – निमगाव केतकी
19 जुलै – इंदापूर (गोल रिंगण)
20 जुलै – अकलूज (गोल रिंगण)
21 जुलै – बोरगाव (उभे रिंगण)
22 जुलै – पिराची कुरोली (धावा)
23 जुलै – वाखरी (उभे रिंगण)
24 जुलै – पंढरपूर प्रवेश व मुक्काम

25 जुलै रोजी पारंपरिक नगर प्रदक्षिणा होईल. आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर पालखी 29 जुलैपर्यंत पंढरपूरमध्ये मुक्कामी राहणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (आळंदी)

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे.

मुक्कामाचे वेळापत्रक:

8 जुलै – आळंदी
9 व 10 जुलै – पुणे
11 व 12 जुलै – सासवड
13 जुलै – जेजुरी
14 जुलै – वाल्हे
15 जुलै – लोणंद (निरा स्नान)
16 जुलै – तरडगाव (चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण)
17 जुलै – फलटण
18 जुलै – बरड
19 जुलै – नातेपुते
20 जुलै – माळशिरस (पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण)
21 जुलै – वेळापूर (खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण)
22 जुलै – भंडीशेगाव (ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण व दसूर फाटा येथे बंधूभेट)
23 जुलै – वाखरी (दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण)
24 जुलै – इसबावी येथे तिसरे उभे रिंगण झाल्यानंतर पंढरपूर प्रवेश
इतर प्रमुख संतांच्या पालख्यांचे प्रस्थान
श्री संत एकनाथ महाराज, पैठण – 21 जून
श्री विठ्ठल-रुक्माई संस्थान, कौंडण्यपूर – 12 जून
श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, सासवड – 12 जून
श्री संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर – 24 जून
श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर – 29 जून
श्री संत तुकाराम महाराज, देहू – 7 जुलै
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी – 8 जुलै
श्री संत निळोबाराय महाराज, पिंपळनेर – 10 जुलै
श्री संत सोपान महाराज, सासवड – 12 जुलै
श्री संत गजानन महाराज, शेगाव – 17 जुलै

आषाढी वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, सामाजिक समतेचा आणि भक्तीभावाचा उत्सव आहे. लाखो वारकरी शिस्त, सेवा, नामस्मरण आणि भक्तीचा संदेश देत पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करतात. राज्य प्रशासनाकडूनही या भव्य सोहळ्यासाठी सुरक्षा, आरोग्य, पिण्याचे पाणी, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांची व्यापक तयारी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!