वडिलांचा मृत्यू, पार्थिव घरी नेताना मुलाला हार्ट अटॅक, कुटुंबाचा एकच आक्रोश, नेमकं घडलं काय?


उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक काळीज चिरणारी घटना समोर आली आहे. निधनानंतर वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मुलगा घरी नेट होता. त्यांच्या मुलगा दुचाकीवरून रुग्णवाहिकेच्या मागून येत होता. यावेळी मुलगा अचानक पडला आणि पुन्हा उठलाच नाही. वडिलांच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्याचेही निधन झाले.

याबाबत माहिती अशी की, कानपूरच्या चमनगंज येथील रहिवासी लायक अहमद यांची प्रकृती बिघडली. त्यांची प्रकृती अगोदरच खराब होती मात्र गुरुवारी रात्री त्यांची तब्येत खालावली. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी नर्सिंग होममध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांचे निधन झाले.

लायक यांचा मुलगा अतिक त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करत होता. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, तेव्हा त्याचा यावर विश्वासच बसला नाही. त्याने वडिलांना गाडीतून कार्डिओलॉजी हॉस्पिटलमध्ये नेले. त्याला असं वाटलं की त्याचे वडील जिवंत आहेत. मात्र, तिथेही डॉक्टरांनी लायक अहमदला तपासून मृत घोषित केले. यामुळे त्याला मोठा धक्का बसला.

अत्यंत दु:खी झालेला अतिक आपल्या वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेत होता. यावेळी तो रुग्णवाहिके मागे आपल्या नातेवाईकासह दुचाकीवरून येत होता. यावेळी आतिक अचानक खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी अतिकला मृत घोषित केले. अतिकला हृदयविकाराचा झटका आला. मुलाचं वडिलांबद्दलचं एवढं प्रेम पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

हे ऐकताच कुटुंबाने एकच आक्रोश केला. त्यानंतर अत्यंत संध्याकाळी वडील आणि मुलाची एकत्र अंत्ययात्रा निघाली. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. या पिता-पुत्राची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली आणि त्यानंतर दोघांवर एकत्रच दफनविधी करण्यात आली. यामुळे कुटूंबाच्या इतर सदस्यांना मोठा धक्का बसला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!