पुन्हा एकदा मोठी रेल्वे दुर्घटना! फलकनुमा एक्स्प्रेसच्या 3 बोगींना भीषण आग प्रवाशांनी बाहेर मारल्या उड्या आणि….


हैदराबाद : पश्चिम बंगालमधील हावडा येथून तेलंगणातील सिकंदराबादसाठी निघालेल्या फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हैदराबादपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या बोम्मईपल्ली आणि पागिडीपल्लीदरम्यान ट्रेन थांबवण्यात आली.

सकाळी ११.३० वाजता हा अपघात झाला. सर्व प्रवाशांनी वेळेत ट्रेनमधून उडी मारून मारून आपले जीव वाचवले. त्यामुळे हानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांची बसमधून रवानगी करण्यात आली.

लकनुमा एक्स्प्रेसमध्ये आग लागली, तेव्हा सर्व प्रवासी वेळीच खाली उतरले. यात कोणाचा बळी गेल्याचे वृत्त नाही. बोम्मईपल्ली आणि पागिडीपल्लीदरम्यान ट्रेन थांबवण्यात आल्या.

ट्रेनला १८ डबे होते. त्यापैकी एस ४, एस ५ आणि एस ६ या तीन बोगींमध्ये आग लागली. आग लागल्याच्या घटनेनंतर दक्षिण मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केरण्यात आल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!