प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन


मुंबई : बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. साराभाई वर्सेस साराभाई मालिका फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचे कार अपघातात निधन झाले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

वैभवीच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती. अपघात कसा झाला याबाबत अजून माहिती समोर आली नाही.

चंदिगड येथील तिचे कुटुंबीय अभिनेत्रीचे पार्थिव मुंबईत आणत आहेत. तिच्या अपघाताची माहिती मिळताच कुटूंबाला एकच धक्का बसला होता. सीआयडी, अदालत आणि साराभाई वर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं भूमिका बजावली आहे.

साराभाई मालिकेतील जास्मीन या भूमिकेने वैभवीला विशेष ओळख निर्माण करुन दिली. तिने दीपिका पदुकोणसोबत देखील काम केले आहे. छपाक’ आणि ‘तिमिर’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!