नाशिकमध्ये खळबळ!! आईची नजर चुकवून खेळायला घराबाहेर गेली अन् घात झाला, घडलं आक्रीत…

नाशिक : तुमच्या घरात लहान मुले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. लहान मुलांकडे दुर्लक्ष केल्यास किती वाईट परिणाम होतो याचा प्रत्येय देणारी घटना समोर आली. नाशिक जिल्ह्यातील देवळ्याच्या खामखेडा इथे ही घटना घडली.
आई घर कामात व्यस्त असताना मुलगी खेळायला घराबाहेर पडली. मात्र बराच वेळा आवाज न आल्याने आई घाबरली. तिने बाहेर येऊन पाहिलं तर चिमुकलीचा मृतदेह होता. खेळता,खेळता पाण्याच्या टाकीत बुडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
देवांशी सोजवळ असे या चिमुरडीचे नाव आहे.
ती सकाळी अंगणात खेळत असताना खेळता खेळता पाण्याच्या टाकीजवळ गेली. तोल जाऊन ती या टाकीत पडली, त्यात पडून तीचा मृत्यू झाला. काही वेळानंतर ती दिसत नसल्याने तीचा शोध घेतला असता पाण्याच्या टाकीत तीचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे सोजवळ कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटना घडू नयेत यासाठी आई वडिलांनी मुलांना एकटं सोडू नये. इतकंच नाही लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडणार नाही. नजर हटली तर लहान मुलांसोबत काय घडू शकतं याची प्रचिती या घटनेतून आली असेल. त्यामुळे आई वडिलांनी लहान मुलांना एकटं सोडू नये, नाहीतर अशा दुर्घटना घडू शकतात.