मुंबईत खळबळ! भरदिवसा घरात घुसले, वृद्धेसह मोलकरणीचे हातपाय बांधले अन्…..


मुंबई : भर दिवसा घरात घुसलेल्या दोन तरुणांनी ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेसह मोलकरणीचे हातपाय बांधून घर रिकामे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील विले पार्ले परिसरातून ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेला तीन दिवस उलटून गेले आहेत. तरीही आरोपींबाबत अजूनही काहीच थांगपत्ता लागला नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित घटना विले पार्ले येथील तेजपाल स्कीम परिसरातील समर्थ निवास इमारतीत घडली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर ६० वर्षी दत्ताराम डिचोलकर आपल्या आई राधाबाई यांच्या समवेत वास्तव्याला आहेत.

त्यांनी आपल्या वयस्कर आईची काळजी घेण्यासाठी संगीता यांना कामावर ठेवलं आहे. घटनेच्या दिवशी रविवारी काही वैयक्तिक कामानिमित्त दत्ताराम घराबाहेर गेले होते. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या आसपास दोन तरुण दत्ताराम यांच्या घरात घुसले.

दरम्यान, यावेळी घरात ८५ वर्षांच्या राधाबाई आणि मदतनीस संगिता घरात होत्या. आरोपींनी घरात घुसताच दोघींना चाकुचा धाक दाखवला आणि त्यांचे हातपाय बांधले. तोंडाला चिकटपट्टी लावली. यानंतर आरोपींनी घरातील सोन्या चांदीच्या दागिण्यांसह तब्बल साठे आठ लाखांचा ऐवज लुटून नेला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!