ईव्हीएमला ‘सर्वोच्च’ तगडा झटका! पहिल्यांदाच झाला थेट ईव्हीएमचा पराभव, सरपंच सुप्रीम कोर्टाच्या डोळ्यादेखत फेरमतमोजणीत विजयी, देशातील पहिलाच निकाल असल्याची चर्चा..

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हरियाणा राज्यातील एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या एका निवडणुकीची फेर मतमोजणी घेण्यात आली त्यावेळी याच निवडणुकीत ईव्हीएम मध्ये विजयी झालेला उमेदवार पराभूत झाला तर पराभूत झालेला उमेदवार विजयी झाला. या घटनेने देशभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हरियाणातील निवडणुकीत एका उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर पराभूत उमेदवाराने ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेत, ईव्हीएम मशिनमधील मतांची थेट आपल्या देखरेखीखाली फेरमोजणी करण्याचे आदेश दिले.
या फेरमोजणीमध्ये खरोखरच धक्कादायक निकाल समोर आला. त्या निवडणुकीत जो उमेदवार पराभूत झाला होता त्यालाच प्रत्यक्षात सर्वाधिक मते मिळालेली यातून दिसून आली तसेच तो विजयी झाला या प्रक्रियेमुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील गंभीर दखल घेत संबंधित मतदार संघाची यापूर्वीची निवडणूक व निकाल रद्द करत पराभूत ठरवलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले.

हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू या गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचे हे प्रकरण असून या गावात सरपंच पदासाठी दोन नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कुलदीपसिंह हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले होते.

मात्र पराभूत झालेल्या मोहित कुमार यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. सत्र न्यायालयाने गावातील बूथ क्रमांक ६९ वरील मतांची फेर मतमोजणी करण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशाला आव्हान देत कुलदीपसिंह पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात गेले.
कोर्टात हा आदेश पंजाब हरियाणा हायकोर्टाने रद्द केला. त्यानंतर मोहित कुमार यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. ३१ जुलै २०२५ रोजी हे प्रकरण कोर्टासमोर सुनावणीस आले तेव्हा कोर्टाने ईव्हीएम आणि अन्य रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका बूथची मतमोजणी करण्याऐवजी सर्वच मतमोजणी पुन्हा करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व इतर नोंदी मागवल्या आणि त्यांच्या रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली मतमोजणी केली. या मतमोजणीनंतर पंजाब हरियाणा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आणि मोहित कुमार यांना सरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र घोषित केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये वोटचोरी म्हणजे मतचोरीचा मुद्दा जोरात चर्चेला आला असून, एका एका घरात दोनशे दोनशे लोक राहत असल्याचे निवडणूक आयोगाच्या मतदार यादी वरूनच दिसून आले. महाराष्ट्रात देखील चंद्रपूर आणि नालासोपारामध्ये या घटना उघडकीस आलेल्या आहेत.