पुणे रिंग रोडच्या कामासाठी अतिरिक्त साडे दहा हजार कोटींच्या निधीला मंजुरी; दिडवर्षे पडून असलेल्या सोरतापवाडी ते वरवे टप्प्याला गती मिळणार काय; पुर्व भागात संभाव्य कोंडीला नियोजन हवेच….

उरुळी कांचन : पुणे रिंग रोडच्या पुर्व विभागातील रखडलेल्या प्रकल्पातील कामासाठी राज्य मंत्रिमंडळाने तब्बल १० हजार ५०२ कोटी ३६ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिल्याने या टप्प्यातील रखडलेल्या कामाचा ‘श्री गणेशा’ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असून ‘एमएसआरडीसी’ ने तात्काळ या कामाला गती द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
पुणे रिंग रोडच्या पुर्व व पश्चिम टप्प्यांपैकी पश्चिम
भागातील रिंग रोडच्या प्रकल्पाचे काम जवळपास ४० % पूर्ण होण्याच्या मार्गावर सुरू आहे. उर्से (ता.मावळ) भागातील दोन्ही बाजूंनी वर्तुळाकार टप्प्यात या कामाला गती मिळाली असून भूसंपादन, पूल ,बोगदे तसेच बांधकामाचे काम ४०% पर्यंत पूर्ण झाली आहेत. मात्र पूर्व भागातील सोरतापवाडी ते वरवे (शिवरे)
या टप्प्यातील कामाला अद्याप ‘श्रीगणेशा’ झाला नसल्याने हे काम प्रशासकीय कामकाजाच्या गोंधळात गेली दिड वर्षे पडून आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने
रिंग रोडच्या कामाची परिस्थिती पाहून या ठिकाणी अतिरिक्त खर्चास मंजुरी दिल्याने सोरतापवाडी ते वरवे या टप्प्यातील ३१.८ किलोमीटरचे काम आता जलदगतीने ठेकेदार कंपनीनेसुरू करावे
अशी आता अपेक्षा आहे.सोरतापवाडी ते वरवे या टप्प्यातील काम पुरंदर विमानतळाला जोडून नियंत्रित प्रवेश मार्ग म्हणून संरक्षित करण्यात येणार आहे.


या टप्प्यात पुरंदर विमानतळाचा प्रवेश मार्ग वगळता या टप्प्यातील मार्ग थेट सोलापूर रस्ता ते कोल्हापूर रस्ता
असा राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यात येणार आहे. तसेच सोलापूर रस्त्यावरील उन्नत मार्गाला ओव्हर ब्रीजटर्मिनल करुन अटल सेतू प्रमाणे विशिष्ठ उंचीवर जोडण्यात येणार असल्याने पुलाची उंची वाढविण्यात येणार असल्याने हे उत्कृष्ठ काम स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना ठरणार आहे.
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित
उन्नत मार्गाचे काम व सोलापूर रस्त्यामार्गे पुणे शहराकडे येणारा प्रचंड लोंढा ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता या टप्प्यातील ठेकेदार एजन्सीचे काम हे जलदगतीने होणे क्रमप्राप्त असून एमएसआरडीसी व एमएसआयडीसी या विभागांनी या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करुन ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत अशी मागणी आहे.
पायाभूत सुविधा समितीने भेट द्यावी
पुणे रिंग रोडच्या एकूण १२ टप्यांतील कामे समाधानकारक गतीने सुरू आहेत. मात्र सोरतापवाडी ते वरवे या टप्प्यात २टक्के पण कामाची प्रगती नसल्याची आवस्था आहे. त्यामुळे पायाभूत
सुविधा समितीने तातडीने हे काम सुरू करण्यासाठी या टप्प्याला भेट देऊन एमएसआरडीसी व एमएसआयडीसी या विभागांना योग्य निर्देश देणे गरजेचे आहे.