अजितदादा सरकारमध्ये आले तरी सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट नाही, चौकशी सुरूच राहणार, भाजपकडून मोठे वक्तव्य…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सामील होत सर्वांना मोठा धक्का दिला. त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
त्यांचा हा निर्णय राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठी घेतलेला आहे, असे भाजपचे प्रदेश महासचिव आमदार श्रीकांत भारतीय यांनी म्हटले आहे.
यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ते म्हणाले, आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, तेच आमच्याकडे आले आहेत. तसेच ते भाजपमध्ये आले नसून सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. सिंचन घोटाळ्यातून कोणताही क्लीन चीट त्यांना देण्यात आलेली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे आता अजित पवारांची चौकशी पुन्हा एकदा सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू आहे, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी ४० आमदारांसोबत शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून त्यांच्यासोबत ९ आमदारांनीही शपथ घेतली. यामुळे एकच खळबळ उडाली. आता आज पक्षाची अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटांची बैठक आहे.
यामुळे कोणाची किती ताकद आहे. हे आजच समजणार आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे घोटाळ्यामुळे भाजपकडे गेले असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.