Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय? पत्रकार परिषदेत केले मोठे विधान, म्हणाले..

Eknath Shinde : राज्यात बहुमत मिळवूनही महायुतीने सरकार स्थापन करण्यासाठी मोठा कालावधी घेतला. मुख्यमंत्री दिल्लीतील बैठकीनंतर त्यांच्या मूळ दरे या गावी गेले. तिथून ते ठाण्याच्या घरी गेले. या दरम्यान महायुतीच्या बैठकी झाल्या नाहीत. तीनही पक्षाचे नेते एकत्र दिसले नाही. त्यावरून राज्यात वेगळ्याच चर्चा रंगल्या.
मुख्ममंत्री कोण असणार या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद झाली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सामील होणार की नाही, याबद्दल सूचक विधान केलं आहे. थोडी कळं काढा, संध्याकाळी निर्णय घेणार आहोत, असं शिंदे म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. Eknath Shinde
मला खूप आनंद आहे, आमच्या टीमने चांगलं काम केले आहे. तब्येत आता चांगली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. संध्याकाळपर्यंत थांबा, आम्ही निर्णय काय आहे तो सांगणार आहोत. असे म्हणताच अजितदादा मध्येच बोलले, तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा, पण माझा निर्णय झाला आहे. मी शपथ घेणार आहे, आता मी काही थांबत नसतो, असे म्हणतातच एकच हश्शा पिकली.
त्यानंतर शिंदे म्हणाले की, अजितदादांना अनुभव आहे पहाटे शपथ घेण्याचा अनुभव आहे आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा सुद्धा अनुभव आहे” असं म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ उडाला.