ज्या कर्जासाठी गिरीश महाराजांनी आत्महत्या केली, त्या कर्जाबाबत एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय, विजय शिवतारेंकडे….

पुणे : देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाली आहे. त्यांच्यावर 32 लाख कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.
शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. आता शिरीष महाराजांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक पाऊल उचललं आहे.
आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली. यामुळे त्यांचे कर्ज फिरणार आहे. एकनाथ शिंदेंना ही घटना समजली आणि त्यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं.
महाराजांनी चिठ्ठीत म्हटले होत की, खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्यांना मदत मागणं चुकीचं पण कृपया करून आई-वडिलांना सांभाळा. दीदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय त्याची सगळी यादी देतोय.
गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करून आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा आणि आम्हाची नवऱ्याबाई तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियंका तिला वेळेत देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो, असं म्हटलं आहे.