Eknath Shinde : महाराष्ट्राचा होतोय बिहार! आता पुण्यातील कुख्यात गुंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, फोटो व्हायरल…


Eknath Shinde : कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातमीला काही तास उलटत नाही, तो आता पुण्यातील एका गुंडासोबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो समोर आला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट करत, महाराष्ट्रात गुंडा राज…, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य’ असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो समोर आला होता. Eknath Shinde

.त्यानंतर सोमवारीच अजित पवार यांची पुण्यातील गुंड असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतल्याचा फोटो समोर आला. या सर्व प्रकरणावरुन राजकीय वादळ सुरु असताना मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळ याचा फोटो आला.

संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. विशेष म्हणजे मगील काही दिवसांपासून राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था पाहता सत्ताधारी नेतेच गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!