Eknath Shinde : मोठ्या घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर, आजपासून पुन्हा बैठकांचा सपाटा…


Eknath Shinde : संपूर्ण राज्य अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा करत आहे. कारण, महायुतीकडून आत्तापर्यंत ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजूनही महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे.

निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला असताना, शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे, पण खातेवाटपावर अजून अंतिम निर्णय होणं बाकी आहे. याबाबत आज महायुतीतील तीन महत्त्वाचे नेते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र येणार आहेत.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील चार दिवसांपासून तब्येतीचे काहीसे समस्या होत्या, ज्यामुळे सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, आज शिंदे सक्रीय होऊन विविध बैठका आणि चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत. शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात आज शासकीय व राजकीय चर्चांना सुरुवात होईल. Eknath Shinde

दरम्यान, महायुतीतील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा होईल. विशेषतः, भाजपने महायुती सरकारच्या शपथविधीसाठी ५ डिसेंबरचा दिवस निश्चित केला आहे. याआधी ४ डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली, आणि विश्वास व्यक्त केला की आजपासून एकनाथ शिंदे अधिक सक्रिय दिसतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!