Eknath Shinde : २ हजार गाड्यांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबर, तानाजी सावंत समर्थक आक्रमक, लोकसभाच द्या, शिंदेकडे मागणी…

Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या लोकसभा जागावाटपाच्या निमित्ताने बरीच दमछाक होताना दिसत आहे. यवतमाळ-वाशिम, हिंगोली आणि रामटेकमध्ये शिंदे गटाला भाजपच्या दबावामुळे आपल्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देता आलेली नाही.
याशिवाय, नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांना संघर्ष करावा लागत आहे. अशातच सोमवारी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी नाराज शिवसैनिकांचा जमाव येऊन धडकला.हे सर्वजण धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आले आहेत. Eknath Shinde
धाराशिवमध्ये अजित पवार गटाने राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. या नाराज कार्यकर्त्यांनी सोमवारी थेट एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थान गाठले.
धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतून उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन केले. तानाजी सावंत समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने मुख्यमंर्त्यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले होते.