Edible Oil Price : सरकारचा तो निर्णय आणि सणासुदीला वाढणार खाद्यतेलाच्या किमती, ग्राहकांना बसणार महागाईची झळ…
Edible Oil Price : सणासुदीच्या काळातच आता सर्वसामान्यांचे स्वयंपाकातील बजेट कोलमडणार असे दिसत आहे. सर्वसामान्य गृहिणींच्या स्वयंपाकातील बजेटवर आता मोठा भार पडेल अस दिसतय. कारण की, खाद्यतेलाच्या किमती आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रातील मोदी सरकार लवकरच खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. याचा परिणाम म्हणून आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती देखील वाढू शकतात असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाने सरकारला खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी अशा सूचना दिल्या आहेत. खरेतर, सध्या कच्चं पाम, सोयाबीन, सूर्यफुल तेलाच्या आयातीवर ५.५ टक्के आणि रिफाईन्ड तेलावर १३.७५ टक्के आयात शुल्क लागू आहे.
मात्र हे आयात शुल्क फारच कमी असून यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात होत आहे. खाद्यतेलाच्या आयातीचा ओघ गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे. देशात उत्पादित होणाऱ्या खाद्यतेला पेक्षा आयात केलेले खाद्यतेल स्वस्त पडत आहे.
त्यामुळे मात्र देशातील प्रक्रिया उद्योग संकटात आले आहेत. सोबतच सरकारच्या या धोरणामुळे तेलबिया उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. त्यांच्या तेलबिया पिकांना अपेक्षित भाव मिळत नाहीये. Edible Oil Price
दरम्यान, याचा सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीन अक्षरश हमीभावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्रालयाने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याबाबतची सूचना दिल्या आहेत.