लाडक्या बहिणींमुळे अर्थव्यवस्था सुधारली, आता त्यांना कर्जही देणार!! अजित पवार यांची मोठी घोषणा..

बारामती : लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाची योजना आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.
याबाबत आज अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देखील देणार आहोत. असेही अजित पवार म्हणाले. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तसेच अजित पवार म्हणाले, आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप आम्ही देत आहोत.
शेतकऱ्यांचा आणि लोकांचा आपण फायदा करून देत आहोत. यासाठी 24000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एक लाख तीस हजार घरांकरिता 500 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा संच आम्ही बसवलेले आहेत. असेही अजित पवार म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत.
दरम्यान, येणाऱ्या काही काळात राज्यातील ग्राहकांचे 70 टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. हे शून्यावर येणार आहे पण मला ते ऐकून भीतीच वाटते ते शून्यावर नाही आले म्हणजे लोक म्हणतात थापा मारतोय, येणाऱ्या काळात याबाबत बदल होतील.
दरम्यान, अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे तसं नियोजन सुरू आहे. महायुतीचं सरकार पुढील काळात सर्व जाती धर्म प्रांत भाषा नागरिकांनासोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे लोकांना याचा फायदा होईल.