अगोदर लागायचे २० तास, आता केवळ 5 तासातच विठुरायाचचे दर्शन!! कसा झाला हा चमत्कार, वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त..

पंढरपूर : आषाढी एकादशी सोहळ्याला अजून चार दिवसांचा अवधी आहे. सध्या पंढरपूरमध्ये देवाच्या दर्शन रांगेत दोन लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत. इतर वेळेला दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असताना भाविकांना २० तास इतका वेळ दर्शनाला लागत असे. मात्र यंदा मात्र व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे यंदा आषाढीमध्ये व्हीआयपी दर्शन बंद झाल्यानंतर मोठा चमत्कार दिसून आला. दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असतानाही फक्त 5 तासांमध्ये भाविक थेट विठुरायाच्या चरणापाशी पोहोचू लागले आहेत. यामुळे सध्या वारकरी समाधान व्यक्त करत आहेत. भाविक आता अल्पावधीमध्ये देवाच्या चरणापर्यंत पोहोचू लागत असल्याने त्यांनाही हे दर्शन सुखकर होत आहे.
यंदा आषाढी एकादशी यंदा 6 जुलै 2025 रोजी आहे. त्यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या याधी याच दर्शनासाठी 15 ते २० तास लागायचे. आता केवळ पाच तासात विठ्ठलाचे दर्शन होत असल्याने भाविकातून समाधान व्यक्त केलं जात आहे. 15 तासाचे दर्शन पाच तासात होऊ लागल्याने दर्शन रांगेवरील ताणही पूर्णपणे कमी झाला आहे.
यावर्षीची आषाढी यंदा विक्रमी होणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाविकांचा दर्शनाचा 15 तासाचा वेळ केवळ पाच ते सात तासांवर आला आहे. यामुळे लवकरच दर्शन घेऊन वारकरी माघारी फिरत आहेत. व्हीआयपी बंदच्या दणक्याने अनेक व्हीआयपी नाराज जरी झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरवर्षी व्हीआयपी आले की इतर सर्वसामान्य लोकांना दर्शन बंद करून त्यांना दर्शन दिले जात होते. यामुळे वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यंदाच्या आषाढीमध्ये आमचे व्हीआयपी फक्त वारकरी असतील ही भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आणि स्वतःही मुखदर्शन घेत आपण केलेला नियम पाळण्यास सुरुवात केली.
त्यामुळेच तथाकथित व्हीआयपी लोकांचे वांदे झाले असले तरी वारकरी भाविक मात्र खुशीत आहेत. सध्या पंढरपूरमध्ये देवाच्या दर्शन रांगेत दोन लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत. अजून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. यावर्षीची आषाढी यंदा विक्रमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.