Dr. Manmohan Singh : देशाने अर्थतज्ज्ञ गमावला!! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात ७ दिवसांचा दुखवटा जाहीर…


Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२व्या वर्षी गुरूवारी रात्री निधन झालं असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते.

कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

आज सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्गज राजकारणी आणि नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे कार्य आणि योगदान भारतीय राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत कायम स्मरणात राहील. Dr. Manmohan Singh

दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, पण काही ठिकाणी त्यांनी केलेली शेरोशायरीतून उत्तरं आणि वक्तव्यं कायम चर्चेत राहिली आहेत. त्यांचा शांत आणि समंजस दृष्टिकोन भारतीय राजकारणात आदर्श ठरला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!