मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; पाणी, सलाईन आणि उपचारही नाकारले, चिंता वाढली


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे सुरू असलेले उपोषण शनिवारी आठव्या दिवशी पोहोचले आहे. आंदोलनस्थळी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपचार घेणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनस्थळी चिंता वाढली आहे.

काल रात्रीपासून जरांगे यांनी पाणी आणि सलाईन घेणेही बंद केले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत कोणतेही उपचार किंवा इतर काहीही स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच उपचार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप

उपचार बंद करण्यामागील कारण स्पष्ट करताना जरांगे यांनी सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांचा उल्लेख केला. सरकारने 58 लाख नोंदी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच हैदराबाद गॅझेटच्या वैधतेबाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. गावागावांत दवंडी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याचीही पूर्तता झालेली नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासनही प्रलंबित

2012 च्या जात पडताळणी कायद्यात मराठा समाजाचा समावेश करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप ही भेट झालेली नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.

हैदराबाद गॅझेटला वैधता देण्यासह विविध मागण्यांवर ठोस कार्यवाही होत नसल्याने आपण उपचार बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनस्थळी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे सरकारकडून पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!