Doda Encounter : डोडामध्ये मोठी चकमक! चार दहशतवादी ठार, लष्कराचे कॅप्टन शहीद…

Doda Encounter : स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी डोडा जिल्ह्यात ओप असार येथे सुरु असलेल्या चकमकीदरम्यान ४८ राष्ट्रीय रायफल्समधील भारतीय लष्करातील एक कॅप्टन शहीद झाले आहेत. येथे अद्यार चकमक सुरू आहेत, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच या कारवाई दरम्यान ४ दहशतवादी ठार झाले. तर एक नागरिकही जखमी झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत एका हाय प्रोफाइल बैठक बोलावली असताना ही चकमक झाली आहे.
डोडामधील असार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. गोळीबार होत असतानाही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला असून परिसरात रक्ताचे डाग आढळून आले आहेत.
सुरक्षा दलांनी M4 रायफलसह दारूगोळा आणि रसद सामग्रीही जप्त केली आहे. तीन पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी शोध पथकाचे नेतृत्व करताना लष्कराचा एक अधिकारी जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. Doda Encounter
डोडामधील असार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी (ता.१४) उधमपूरच्या रामनगर तहसीलमधील दुडू बसंतगडच्या डोंगराळ भागात चार दहशतवादी दिसून आले.
ते आसरमार्गे सेओजधरमार्गे डोडा जिल्ह्याच्या दिशेने निघाले असताना सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. सेजधर भागात दहशतवादी दिसले, मात्र धुक्याचा फायदा घेत ते पळून गेले. या परिसरात खराब हवामानामुळे धुके पसरले होते. दोन फूट अंतरावरूनही दिसत नसल्याने सुरक्षा दलांना शोध मोहिमेत अडचणी येत आहेत.
दरम्यान, दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफलचे कॅप्टन दीपक सिंग या चकमकीत शहीद झाले आहेत. डोडा इथं या घटनेनंतर शोध मोहिम सुरू आहे.
भारताकडून राबवण्यात येत असलेल्या दहशतवाद्यांच्या सर्च ऑपरेशननंतर दहशतवाद्यांनी तेथेच शस्त्रे टाकून पळ काढला. अमेरिकन एम ४ रायफल जप्त करण्यात आली. तीन बॅग्जमध्ये काही स्फोटके आढळली आहेत. दहशतवादी अकर क्षेत्रात एका नदीजवळ लपले होते.