Diwali 2023 : दिवाळीसाठी ऑनलाइन खरेदीपासून राहा सावध! नाहीतर बँक अकाऊंट होईल रिकामे, जाणून घ्या…


Diwali 2023 : दिवाळीचा सण येताच आजूबाजूचे वातावरण खूप बदलून जाते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते लोक उत्सवाच्या तयारीत व्यस्त असतात. दुसरीकडे, लोक दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात जात असताना, बरेच लोक ऑनलाइन शॉपिंग देखील करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का दिवाळीचा सणाचा फायदा घेऊन फसवणूक करणारे लोकांची फसवणूकही करतात आणि याचे कारण कधी-कधी आपली छोटीशी चूक असते. त्यामुळे दिवाळीच्या Diwali 2023 निमित्ताने ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ते आपण जाणून घेऊयात…

प्रत्यक्ष छायाचित्र, समीक्षण..

खरेदीदारांना आकृष्ट करून घेऊ शकेल असे छायाचित्र ऑनलाइन संकेतस्थळावर प्रदर्शित केले जातात. यामुळे अशा छायाचित्रांच्या प्रेमात पडून खरेदी करणे शक्यतो टाळावे. वस्तूखाली अन्य खरेदीदारांनी प्रत्यक्ष फोटो तसेच खरेदी केलेल्या वस्तूचे समीक्षण आवर्जून पाहावे. अलीकडच्या तारखेनुसार समीक्षण याचा सारासार विचार करूनच खरेदी व्यवहार पूर्ण करावे.

कोणत्याही लिंक्सवर विश्वास ठेऊ नका..

तुमच्या मोबाईलवर मेसेज, व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अनोळखी लिंक्स पाठवल्या जातात. या संदेशांमध्ये, विविध खरेदी सवलती किंवा आकर्षक ऑफर नमूद केल्या आहेत आणि फायदे मिळविण्यासाठी, दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आहे. मात्र चुकूनही या लिंक्सवर क्लिक करू नका, अन्यथा या बनावट असल्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

विश्वसनीय संकेतस्थळाला प्राधान्य..

मोठ्या प्रमाणात सवलतीचे आकडे दाखवणाऱ्या अनेक संकेतस्थळ सध्या सुरू आहेत. यापैकी अनेक संकेतस्थळ अज्ञात आणि असुरक्षित आहेत. यांच्या माध्यमाने खाते हॅक करून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विश्वसनीय संकेतस्थळावरून खरेदीला प्राधान्य हवे.

ओटीपी शेअर करू नका..

आजकाल, बहुतेक फसवणूक ओटीपी शेअर केल्यामुळे होताना दिसत आहे. यामध्ये तुम्हाला काही ऑफर्सबाबत कॉल येतो, ज्यामध्ये तुम्ही लॉटरी जिंकल्यासारख्या गोष्टी सांगितल्या जातात. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी विचारला जातो आणि तुम्ही तो शेअर करताच. त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही देऊ नका.

सवलतींचा मोह टाळा..

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये एखादी लिंक पाठवून मोठ्या सवलतीचे तुम्हाला आमिष दाखवतात. लिंक तुम्हाला एका बनावट संकेतस्थळावर घेऊन जाते. हे संकेतस्थळ हुबेहूब खऱ्या पोर्टलसारखे भासते. मात्र प्रत्यक्षात ही बनावट असल्याने पैसे भरल्यानंतर लक्षात येते. या प्रकाराला फिशिंग म्हणतात. यामुळे ई-मेलवर आलेल्या अनोळखी हायपरलिंकवर क्लिक करणे टाळायला हवे.

इथे करा तक्रार ..

-ऑनलाइन संकेतस्थळावरून फसवणूक झाली असेल, तर न्याय मिळवण्यासाठी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करावी लागते. ग्राहक न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता.

-फोनवरच तक्रार करायची असल्यास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच) क्रमांक १८००-११-४००० किंवा १९१५ या क्रमांकावर संपर्क करावा. (वेळ – सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत राष्ट्रीय सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस ). ८८००००१९१५ हा व्हॉटसॲप क्रमांक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!