धाराशिव मतदासंघात पाटील घराण्यांतच लढतीची शक्यता! अर्चना पाटील ओमराजेंना देणार आव्हान..!!
मुंबई : धाराशिव लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील यांच्यात पारंपरिक लढत होण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमधून त्यांची उमेदवारी देखील घोषित झाली आहे.
धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने आता राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील मैदानात उतरल्या आहेत. ही जागा राणा जगजितसिंह पाटील यांनी लढवावी, असा प्रस्ताव यापूर्वीच अजित पवार यांनी दिला होता.
मात्र, सध्या भाजपात असणा-या राणा पाटील यांनी यासाठी साफ नकार दिला आहे. राणा जगजितसिंग पाटील यांनी आज सकाळीच अजित पवारांची भेट घेतली होती.
Views:
[jp_post_view]