धनंजय मुंडे हेच मोठे आका!! आता ड्रग्ज प्रकरणी मुंडेच मास्टरमाईंड? राजकारणात खळबळ उडवणारी माहिती आली समोर….

बीड : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का लावण्यात आला नाही. आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानातून भारतात ड्रग्जची तस्करी होत असल्याचे एका कारवाईतून उघड झाले. गुजरातमध्ये ८९० कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्यातील कृष्णा सानप व दत्ता आंधळे हे दोन आरोपी वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. त्यांचे धनंजय मुंडे यांच्या सोबत फोटो असल्याचे सांगितले आहे. सुरेश धस यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी मोर्चा निघाला. आमदार धस म्हणाले, तुमच्या खंडणीआड आल्याने हत्या केली. तत्पूर्वी, खंडणीची तक्रार घेऊ नका म्हणून पोलिसांना आकाने फोन केले. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तसेच वाल्मिक कराडने राज्यातील १४० शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कृषीमंत्री माझ्या जवळचे आहे, तुम्हाला अनुदान मिळवून देतो, असे सांगत वाल्मीक कराड याने १४० शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. या सर्वांना ११ कोटी २० लाख रुपयांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे दिवसेंदिवस कराडच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पैसे परत मागितल्यावर मारहाण करून हाकलून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचा हा प्रताप समोर आला आहे. सोलापूरसह राज्यातील १४० ऊस तोडणी यंत्र मालकांना ११ कोटी २० लाख रूपयांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे.