धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं लग्न झालंच नाही? कोर्टात तर वेगळाच राडा रंगला, मग न्यायाधीश म्हणाले, मुलं कोणाची?


मुंबई : अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (ता.२९) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा शर्मासोबत झालेला लग्न हे अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी केला. यानंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत?, असा सवाल न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांच्या वकीलाला विचारण्यात आला आहे.

यावर हे सगळे पुरावे आम्ही सादर करू…आम्हाला वेळ हवा आहे, असं करुणा शर्माच्या वकीलांनी सांगितले. यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असा न्यायालयाने सांगितले आणि पुढील सुनावणी ५ एप्रिलला ठेवण्यात आली आहे.

मुंडे यांच्या वकिलांनी पुढे युक्तिवाद केला की, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा हे विवाहबंधनात नसून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. या संबंधातूनच या दोन मुलांचा जन्म झाला आहे. मात्र, त्यांनी कधीही एकमेकांशी अधिकृतपणे लग्न केले नाही.

त्यामुळे, विवाहित पत्नी म्हणून पोटगी मागण्याचा करुणा शर्मा यांचा दावा कायदेशीर दृष्ट्या टिकू शकत नाही, असा युक्तिवाद करत त्यांनी वांद्रे न्यायालयाचा पोटगीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली असण्याची शक्यता आहे. या युक्तिवादामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!