Devendra Fadnavis : शरद पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष सुरू! उपमुख्यमंत्र्यांची जहरी टीका….


Devendra Fadnavis : पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला. असे संघर्ष आपण अनेक घराण्यात पाहिले असतील. पवारांनी अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले असून हे कालचक्र आहे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

नुकतीच एका मराठी टीव्ही चॅनेलने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून त्यांनी एक काळ गाजवला आहे.

मी शरद पवारांचं पर्व वगैरे होते असे काही मानत नाही. आजही ते संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. पण आज लोकांना देशात एकच नेतृत्व मोठं आणि आश्वासक वाटतं ते म्हणजे मोदींचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांचा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. Devendra Fadnavis

पुढे फडणवीसांना तुम्ही अजितदादांना सोबत घेऊन बदला घेतला आहे का? असा सवाल विचारताच त्यांनी, मी स्वत:ला चाणक्य समजत नाही. शरद पवार चाणक्य असतील. समजा कोणी धोका दिला किंवा विश्वासघात केला तर त्याला उत्तर द्यावं, हे मी राजकारणातच शिकलो आहे. राजकारणात अपमान होत असतात. पण विश्वासघात सहन करायचा नसतो. म्हणून मी बदला घेतला असं म्हणणार नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!