Devendra Fadnavis : मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की…! अखेर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ…


Devendra Fadnavis : अखेर १३ दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नंबर वनचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २१ वे मुख्यमंत्री बनले आहेत.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीला २८८पैकी तब्बल २३० जागांवर यश मिळाले. महायुतीला मिळालेलं हे यश अभूतपूर्व असं यश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात कोणत्याच युतीला आणि आघाडीला इतकं यश मिळालेलं नव्हतं.

या यशात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपने १३२ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं. पण तरीदेखील महायुतीत अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडी, तसेच राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने घेतलेला वेळ यामुळे शपथविधीचा कार्यक्रम रखडला. अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल १३ दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!