Devendra Fadnavis : …तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होतो!! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठं वक्तव्य, राजकारणात खळबळ

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मनोज जरांगेंकडून करण्यात आलेल्या आरोपांना फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयात कोणताही अडथळा आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर ते तत्काळ राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेतील.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरातील विविध प्रकल्पांबाबत झालेल्या चर्चेनंतर, त्यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे राज्याचे सर्व अधिकार असतात, आणि मी त्यांच्या आदेशानुसार काम करतो. जर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षणासंदर्भात अडथळा आणतो आहे, तर मी त्वरित राजीनामा देईन असं त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
पुढे ते म्हणाली, मला याची कल्पना आहे की, मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सगळे मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर काम करत असतात.
एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करतो. त्यामुळे मी त्याच्या पुढे जाऊन सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे यांना विचारावीत, असे फडणवीस म्हणाले.