Devendra Fadnavis : आपले मोदीजी फक्त भारताचे नव्हे, तर शंभर देशाचे नेते, देवेंद्र फडणवीस अस का म्हणाले?


Devendra Fadnavis : जगातील शंभर देश म्हणतात, आम्ही कोविडच्या काळात मोदीजी मुळं जिवंत आहोत, म्हणजे आपले मोदीजी फक्त भारताचे नव्हे तर शंभर देशाचे नेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कोविडच्या काळात मोदीजींमुळे जिवंत आहोत. जगातले अर्थशास्त्रज्ज्ञ मोदींनी भारतात ही क्रांती कशी घडवली? अशी विचारणा करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, बैलगाडा धावतो तसा विकासाचा वेग आपल्याला गाठायचा आहे. मोदीजी जगातील शंभर देशाचे नेते आहेत. ते पुण्यात प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. Devendra Fadnavis

बारामतीची निवडणूक झाल्यावर शरद पवार साहेबांचे वक्तव्य ऐकलं अन लक्षात आलं असेल मोसम बदलला आहे. ४ जूननंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे लागतील. आपलं दुकान चालत असताना, आपण दुसऱ्या दुकानात आपलं दुकान शिफ्ट करतो का? याचा अर्थ आता अजित पवारांची हवा सुरू झाली आहे.

दरम्यान, दुसरीकडे शरद पवार हे उद्धव ठाकरेंचा पक्ष घेऊन डुबणार आहेत. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भाजप सोबत येण्याचं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत येण्याची ऑफर दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!