Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांच्या मागे कोणाचा हात? आता सरकारकडून होणार सखोल चौकशी, केली मोठी घोषणा…

Devendra Fadnavis : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर मराठा समाजाने राज्यभरात आंदोलने केली. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागले.

तसेच मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागील दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी कडवी टीका केली होती. महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. याचे तीव्र पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार आहे, असे म्हटले आहे.

या प्रकरणी आता एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व माहिती समोर येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. रात्री जाऊन जरांगे पाटलांना परत आणणारे कोण आहेत? कोणाकडे बैठक झाली? हे आरोपी सांगत आहेत. आम्हाला दगडफेक करा, असे आरोपीने जबाबात सांगितले आहे. Devendra Fadnavis

ज्या पोलिसांवर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले आहेत.