Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर गंभीर आरोप, व्हिडिओच शेअर केला, व्हिडिओमध्ये नेमकं काय?


Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे.

तसेच अनेक नेते, कार्यकर्ते नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बड्या नेत्यांकडून त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूरच्या दौऱ्यावर होते.

यावेळी त्यांनी आज इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले.

अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या निधनासाठी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शुभेच्छा दिल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ नाना पटोले यांच्या अकोलेतील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आहे. Devendra Fadnavis

या पोस्टमध्ये फडणवीस यांनी नाना पटोले यांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तसेच या मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘काँग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर आहे.

निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा ! खा. संजय धोत्रे जी यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’

नाना पटोले काय म्हणाले होते?

अकोला येथील प्रचार सभेत नाना पटोले यांनी अकोल्यातील विद्यमान खासदारांचा उल्लेख करताना असे शब्द वापरले होते. विद्यमान खासदार हे व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांचे व्हेंटिलेटर कधीही काढतील, असे म्हणत नाना पटोले यांनी विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा उल्लेख केला होता.

त्यावरुन आता देवेंद्र फडणवीसह यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. इतकेच नाही तर संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना देखील फडणवीस यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!