Devendra Fadnavis : मीटरचे रिडींग न घेता ७ लाखांवर वीज बिले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली चूक मान्य..
Devendra Fadnavis : वीज मीटरचे रीडिंग न घेता, त्याचे फोटो न काढता नागरिकांना बीज बिल दिले जात असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. त्यामुळे यापुढे लोकांनी मीटर लावले नसतानाही त्यांना विजेचे बिल आले असेल तर अशा प्रकारचे खोटी वीज बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
गेल्यावर्षी १४ लाख ३४ हजार चुकीची बिले गेली होती. यावर्षी त्याची संख्या अर्ध्यावर येऊन ती आता ७ लाखांवर आली आहे, असे सांगतानाच वीज बिलांसाठी वेगवेगळ्या एजन्सींना काम दिले आहेत. ही संख्या अजून कशी कमी होईल याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. Devendra Fadnavis
तसेच पालघर जिल्ह्यातील आशागड येथील एका आदिवासी गरीब कुटुंबाला महिन्याचे १ लाख २५ हजार रुपयांचे खोटे वीज बिल आल्याची माहिती देत विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना मीटर रीडिंग न करता विजेची बिले दिले गेल्याची कबुली दिली. यासंदर्भात संबंधित कंपनीवर कारवाई केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीस म्हणाले, पालघर हा दुर्गम भाग आहे. कर्मचारी फोटो काढण्यास जाण्याचा कंटाळा करतात आणि थेट कुठली तरी इमेज टाकून ते बिल काढतात. त्यामुळे यासंदर्भात विशेष मोहीम घेण्यास सांगणार आहे. तसेच जी बिले २५ किंवा ५० हजारांच्यावरची आहेत आणि घरे छोटी आहेत त्या सर्वांना योग्य रकमेचे बिल देणार, आवश्यकता असल्यास त्यांना हप्त्यात पैसे भरण्याची मुभाही देण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.
यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्यावर्षी १४ लाख ३४ हजार चुकीची बिले गेली होती. यावर्षी त्याची संख्या अर्ध्यावर आली, असे सांगतानाच बिलांसाठी वेगवेगळ्या एजन्सींना काम दिले आहेत. ही संख्या अजून कशी कमी होईल याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.