Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींबाबत मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय…

Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीच्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये राज्याच्या लाडकी बहीण योजनेबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेबाबत सकारात्मक वचन दिले आणि महिलांसाठी सुरू असलेल्या या योजनेला महत्त्व देण्याचे स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात, पण विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या रकमेची वाढ करत २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. Devendra Fadnavis
या घोषणेला पूर्णत्व देण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात तातडीने जमा होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.