Devendra Fadnavis : पुण्यातील लैंगिक गुन्ह्याच्या घटनेनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय म्हणाले, थेट संस्थाचालकांना…


Devendra Fadnavis : वानवडी येथे सहा वर्षांच्या असलेल्या दोन विद्यार्थीनींचा स्कूल बसच्या ड्रायव्हरने लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बस ड्रायव्हर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सर्व संस्थाचालकांना बोलावून त्यांना संस्थेत काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वर्तन योग्य आहे की, नाही याबाबत तपासणी करण्यास सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यामध्ये स्कूल व्हॅन मध्ये एका चालकाने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले आहे. यासह त्याने आणखी एका मुलीलाही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरोधात आता पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कठोर कलमे लावण्यात आली आहे. Devendra Fadnavis

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित संस्थाचालकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांचा काही दोष आहे का हे तपासले जात आहे. विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे.

त्यामध्ये वाहन चालक म्हणून काम करणारे योग्य आहे की नाही, याची तपासणी केली पाहिजे याबाबत इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना केल्या आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!