Devendr Fadanvis : फडणवीस ठरले किंगमेकर! अद्भुत यशानंतर कोणी केला पहिला फोन? संध्याकाळी येतो चा दिला निरोप…

Devendr Fadanvis : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सध्याच्या कलानुसार महायुती २१६ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
भाजप १२८ जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट ५४ आणि अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आता नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत फडणवीस आपल्या आई सरिता फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधताना दिसत आहेत. राज्याच्या सत्तेसाठी मिळालेल्या यशाच्या संदर्भात त्यांच्या आईने त्यांना शुभेच्छा दिल्या. Devendr Fadanvis
यावेळी फडणवीसांच्या आईने त्यांना विचारले, तुम्ही नागपूर केव्हा येत आहात? त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले, मी संध्याकाळी येतो, इथे काही कामं संपवतो आणि मग घरी येतो. यावेळी या संवादात फडणवीसांचे कुटुंबीयांशी असलेले साधे आणि निःस्वार्थ नातं दिसून आले. Devendr Fadanvis
सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्चस्तरीय नेत्यांपर्यंत सर्वच स्तरांवर भाजपच्या विजयाचं जश्न साजरं करण्यात येत आहे. यानंतर राज्यातील सरकार स्थापनेसाठी भाजपने वेग घेतला असून, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यांच्या विजयावर एकाचवेळी कुटुंबीयांची आणि कार्यकर्त्यांची अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.