हिमालयाच्या प्रदेशात विनाशकारी भूकंपाचे सावट…!

हिमाचल ,उत्तराखंड आणि नेपाळचा पश्चिम भागात मोठ्या भूकंपाची शक्यता...


नवी दिल्ली : तुर्की भूकंपादरम्यान भारतासह जगभरात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत .आता यातच नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (एनजीआरआय) शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, हिमालयीन भागात लवकरच मोठा भूकंप येऊ शकतो. ते म्हणाले की भूकंपाची तीव्रता लक्षणीय असू शकते ज्यामुळे परिसरात मोठे नुकसान होऊ शकते.

याचदरम्यान , संरचना मजबूत करून जीवित आणि मालमत्तेची हानी कमी केली जाऊ शकते असेही ते म्हणाले. ANI च्या बातमीनुसार, हैदराबादस्थित NGRI चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पूर्णचंद्र राव म्हणतात की पृथ्वीचे कवच अनेक प्लेट्सचे बनलेले आहे आणि या प्लेट्स सतत वळत राहतात. भारतीय प्लेट्स दरवर्षी पाच सेंटीमीटरपर्यंत सरकत आहेत आणि त्यामुळे हिमालयाचा प्रदेश प्रचंड तणावाखाली आहे. त्यामुळे हिमालयीन भागात मोठा भूकंप होऊ शकतो. भूकंपाची तीव्रता 8 रिश्टर स्केल राहू शकते.

भूकंपाची तीव्रता 8 रिश्टर स्केल राहू शकते डॉ. पूर्णचंद्र राव म्हणाले की, हिमाचल प्रदेश, नेपाळचा पश्चिम भाग आणि उत्तराखंडमध्ये भूकंप होऊ शकतो. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8 असू शकते, असे डॉ.राव यांनी सांगितले. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होण्याचे कारण सरासरी बांधकाम असल्याचे डॉ.राव यांनी सांगितले. ते म्हणाले की, भूकंप आपण रोखू शकत नाही पण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भक्कम इमारती बांधल्या पाहिजेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!