Delhi : ‘न्यूजक्लिक’चे संस्थापक प्रबिर पुरकायस्थ यांच्यासह २ जणांना अटक, कार्यालयही सील, नेमकं घडलं काय?


Delhi  नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ‘न्यूजक्लिक’ या न्यूज ऑनलाइन पोर्टलचे संस्थापक प्रबीर पूरकायस्थ यांच्यासह दोघजणांना अटक केली आहे. न्यूजक्लिक आणि त्याच्या पत्रकारांशी संबंधित ३० परिसरांवर दिवसभर छापे टाकून चौकशी केल्यानंतर दोघांना अटक केली आहे. Delhi

न्यूजक्लिकच्या अनेक पत्रकारांच्या घराची देखील झडती घेतली. केंद्र सरकारच्या युएपीए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.त्यांना बुधवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याच प्रकरणात स्पेशल सेलच्या कार्यालयात अनेक आरोपींची चौकशी सुरू राहणार आहे.

तसेच दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने काल दिवसभरात ३७ जणांची चौकशी केली. या सर्वांकडून अनेक दस्तावेज व उपकरणे पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्यानंतर न्यूजक्लिक या ऑनलाइन पोर्टलचे संस्थापक प्रबीर पूरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

दक्षिण दिल्लीतील साकेत येथील न्यूजक्लिकचे कार्यालयही सील करण्यात आलं आहे. चीनच्या समर्थनार्थ प्रचारासाठी पैसे मिळाल्याच्या आरोपानंतर ‘न्यूजक्लिक’वर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली-एनसीआर भागात विशेष सेलचे छापे सकाळपासून सुरू झाले. नंतर प्रबीर पुरकायस्थ यांना ‘न्यूजक्लिक’च्या दक्षिण दिल्लीतील कार्यालयात नेण्यात आलं, जिथे फॉरेन्सिक टीम आधीच उपस्थित होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!