Delhi High Alert : दिल्ली, पंजाबमध्ये हायअलर्ट, स्वातंत्र्यदिनी आत्मघाती हल्ल्याचा कट, यंत्रणा सावध…

Delhi High Alert : सध्या जम्मूमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील एक अथवा दोन दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान दिल्ली किंवा पंजाबमध्ये आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
पण गुप्तचर यंत्रणांनी हेदेखील सूचित करते की सुरक्षा दलांच्या मोठ्या प्रमाणातील तैनातीमुळे १५ ऑगस्टला हल्ल्याची योजना आखली गेली नसावी. परंतु एक किंवा दोन दिवसांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेला लागून असलेल्या एका गावात शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली हालचाली दिसून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका गुप्तचर माहितीच्या हवाल्याने सूत्राने सांगितले. Delhi High Alert
१ जून रोजी स्फोटकांची/आयईडीची एक खेप जम्मू शहराच्या एका अंतर्गत भागात पोहोचली. या स्फोटकांचा वापर पुढील काही दिवसांत सुरक्षा आस्थापने, छावण्या, वाहने अथवा महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे सुत्रांनी पुढे म्हटले आहे.